इडनबर्ग – स्काॅटलंड येथील एका ओसाड गुहेत सोण्याची मोठी खाण सापडल्याची माहिती समोर आली आहे. या खाणीत अब्जो रूपयांचं सोनं सापडलं आहे. तसेच नोव्हेंबरपासून या खाणीत खोदकाम सुरू करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्काॅटलंड येथील एका नॅशनल पार्कमध्ये अनेक वर्ष जुनी एक गुहा आहे. त्या गुहेत ही खाण सापडली आहे. खाणीत मोठ्या प्रमाणात सोनं असल्यामुळे स्काॅटलंडला मोठा फायदा होणार आहे. तसेच तेथील लोकांनाही याचा लाभ होणार आहे.
डोंगरामधील घनदाट जंगलात ही खाण सापडली आहे. त्या ठिकाणी अनेक गुहा आहेत मात्र तेथे आजपर्यंत कोणीही गेले नव्हते. आता या गुहा देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणार आहेत.
कोनिश माइन असं या गुहेचं नाव असून ती स्काॅटलंडच्या टिनड्रम आणि ट्राॅसच्स नॅशनल पार्कच्या मधोमध आहे. ही या देशात सापडलेली पहिली खान असून तेथे नोव्हेंबर महिन्यापासून खोदकाम सुरू होणार आहे.
स्काॅटलंड रिसाॅर्सला या खाणीचं टेंडर देण्यात आलं आहे. या खाणीत 22 अब्जाहून अधिक किंमतीचं सोनं असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अनेकांनी या खाणीतील सोनं घेण्याची तयारीही दर्शवली आहे.
असेही सांगितले जाते की, या खाणीची माहिती 1980 साली समोर आली होती. मात्र तेंव्हा कोणी याकडे लक्ष दिले नाही.