एमएमटीसीची सोने बाय-बॅक व एक्‍सचेंज ऑफर

एमएमटीसीची सोने बाय-बॅक व एक्‍सचेंज ऑफर शुध्दता तपासण्यासाठी अत्याधुनीक यंत्रणा

 

नवी दिल्ली- सोने शुद्धीकरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एमएमटीसी कंपनीने राजधानी दिल्लीत सोने बायबॅक आणि एक्‍सचेंज ऑफर सुरू केली आहे. लवकरच देशभर हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

यासाठी अल्प प्रमाणात शुल्क आकारले जाणार आहे. ग्राहकांना सोन्याचा कमाल भाव बॅंक खात्यात पाठविला जाईल किंवा सोन्याचे बार दिले जाणार आहेत. एमएमटीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सिंह यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये नागरिकांना सोने विकावे लागत आहेत. त्यांना या काळात जास्तीत जास्त परतावा मिळावा याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे.

शुद्धता तपासण्यासाठी आमच्याकडे अत्याधुनिक यंत्रणा आहे. त्यामुळे कमी वेळात सोन्याची शुद्धता तपासली जाते. मात्र ही सोय किमान दहा ग्रॅम सोने विकणाऱ्यांसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. सध्याच्या आंतरराष्ट्रीय भावानुसार या सोन्याचे मूल्यांकन केले जाणार आहे. सोने तपासण्याची प्रक्रिया साठ मिनिटात संपेल. त्याचबरोबर सर्व प्रक्रिया ग्राहकांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहता येईल. त्यामुळे कामकाजात पारदर्शकता येईल असेल ते म्हणाले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.