नवी दिल्ली- व्होडाफोन कंपनीने कथित भेदभाव करणारा प्राधान्यक्रमाच्या सेवेचा प्लॅन सादर केला होता. त्याविरोधात दूरसंचार नियामक अधिकारीनी म्हणजे ट्रायने चौकशी सुरू केली होती मात्र दरम्यानच्या काळामध्ये व्होडाफोन कंपनीने या प्लॅनमध्ये सुधारणा केल्या असल्यामुळे व्होडाफोनच्या या प्लॅनसंबंधातील चौकशीत थांबविली आहे.
गेल्या महिन्यात ट्रायने व्होडाफोन कंपनीला या संदर्भात कारणे दाखवा नोटीस दिली होती. या प्लॅनमुळे पारदर्शकता राहत नाही, तसेच ग्राहकांची दिशाभूल होते, असे ट्रायचे म्हणणे होते. त्यानंतर व्होडाफोन कंपनीने वेगवान सर्विस देण्यासंदर्भातील योजनेत बदल केला आहे.