नवी दिल्ली – जागतिक शेअर आणि चलन बाजारात अस्थिरता निर्माण झाल्यामुळे ही गुंतवणूक सोने आणि चांदीकडे वळू लागल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली.
अखिल भारतीय सराफा संघटनेने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सराफात शुद्ध सोन्याचे दर 800 रुपयांनी वाढून 36,970 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर स्टॅन्डर्ड सोन्याचे दर 800 रुपयांनी वाढून 36,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
याच कारणामुळे शनिवारी सोन्याचे दर 540 रुपयांनी वाढले होते. दिल्ली सराफात तयार चांदीचे दर 1 हजार रुपयांनी वाढून या चांदीचा दर 43,100 रुपये प्रति किलो झाला.