काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान पती निक जोनास आणि आई मधु चोप्रा यांच्या उपस्थितीत सिगारेट ओढतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी तिच्या फॅन्सनी तिला ट्रोल केले होते. आता तिने परत तसाच उद्योग केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा युजर्सच्या रडारवर आली आहे.
प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ती अल्कोहोलच्या एका ब्रॅन्डची जाहिरात करताना दिसते आहे. या जाहिरातीत प्रियांकाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या छटा बघायला मिळतात. प्रियांकाने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. “तुम्हाला प्रत्येक संधी स्वीकारायला हवी. धोका पत्करायला हवा. रस्ता बनवावा लागेल.’ अशी कॅप्शनही तिने दिली आहे. यावर युजर्सनी तिला जोरदार ट्रोल केले आहे. “दिदीचा अस्थमा बरा झालेला दिसतो. ‘असे एका युजरने म्हटले आहे.
तर दुसऱ्याने “मद्यपान केल्यावर अस्थमा बरा होतो का. अभिमान वाटण्यासारखी बाब आहे का.’ असे उपहासाने म्हटले आहे. तर आणखी एकाने “छोरी हाथ से निकल गयी.’ अशी थेट टीकाही केली आहे. आपल्याला वयाच्या 5 वर्षापासून दम्याचा त्रास आहे. आईने केलेल्या उपचारांमुळे दमा बरा झाला, असे प्रियांका लग्नाच्या आगोदर म्हणाली होती.