मुंबई : दैव बलवत्तर म्हणून अनेकांचे त्याचा जीव वाचला अशी वाक्य आपण अनेकांनी ऐकली असतील. पण या म्हणीचा प्रत्यय तिसऱ्या मजल्यावरुन कोसळूनही तीन वर्षांचा चिमुकला बचावला आहे. विशेष म्हणजे एवढ्या उंचावरुन कोसळून देखील त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला घरी सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील ओझर या गावात तीन वर्षांचा मुलगा तिसऱ्या मजल्यावरुन थेट खाली रस्त्यावर कोसळला, मात्र त्याला कुठलीही दुखापत झाली नसून तो सुखरुपरित्या बचावला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ओझरच्या चांदनी चौकातील अलसना अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या फेयजान सद्दाम शेख या तीन वर्षांच्या मुलासोबत गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
फेयजानची आई घरात काम करत असतानाच तो खेळता खेळता घराच्या बाल्कनीत गेला आणि त्याचा तोल गेल्याने तो थेट खाली रस्त्यावर पडला. याच वेळी रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या एका इसमाने त्याला उचलले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने इथे गोळा झाले. त्याला तात्काळ जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला. फेयजानला कुठलीही इजा झाली नसल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितले णि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.