मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. श्रद्धा कपूरचे सेलिब्रिटी फोटोग्राफर बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. दोघेही 4 वर्षे एकत्र होते. पण आता ते वेगळे झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
रिपोर्टनुसार, या जोडप्याचे ब्रेकअप होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गोव्यात श्रद्धाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला रोहनने हजेरी लावली नसल्याची चर्चा आहे. महत्वाचे रोहन अभिनेत्रीच्या वाढदिवशी व्यस्त नव्हता तरी सुद्धा तो गोव्यात गेला नाही. अनेक रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, या दोघांच्या नात्यात जानेवारीपासूनच दुरावा आला आहे. त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
असंही बोललं जात आहे की, श्रद्धा कपूरच्या कुटुंबाला रोहन पसंत आहे. श्रद्धा आणि रोहन हे बालपणीचे मित्र आहेत, त्यांच्या कुटुंबातही एकमेकांशी चांगले नाते आहे. श्रद्धा आणि रोहन गेल्या 4 वर्षांपासून डेट करत होते. मात्र त्यांनी कधीही त्यांचे नाते अधिकृत केले नाही. दोघे अनेकदा डिनर डेटवर एकत्र दिसले. इंटरनेटवर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही आल्या होत्या, मात्र आता शहनाईचा आवाज येण्याआधीच दोघे वेगळे झाले आहेत. ब्रेकअपच्या बातमीवर दोघांपैकी कोणाचीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.