मडगाव – पूनम पांडेने गोव्यात सरकारी मालमत्ता असलेल्या काणकोण येथील चापोली धरणावर पाॅर्न व्हिडीओ शुट केला आहे. या पाॅर्न व्हिडीओ शुटवरून गोव्यातील राजकारण चांगलच तापलं असून शूटसाठी परवाणगी कोणी दिली, भाजप सरकार गोवा हे पाॅर्न डेस्टिनेशन म्हणून प्रमोट करू पाहत आहे का, असा सवाल गोवा फाॅरवर्ड पक्षाने केला आहे.
पूनम पांडेनं हनिमून साजरा करण्यासाठी गोव्यात आली असता काणकोण येथील चापोली धरणावर दोन महिन्यापूर्वी हा व्हिडीओ शूट केला होता. हा व्हिडीओ गोव्यात प्रचंड व्हायरल झाला आहे. याप्रकरणी काणकोण येथील एका स्थानिक युवकाने पोलिसात तक्रार देखील केली आहे.
पूर्णपणे पाॅर्न या व्याख्येत मोडणारा हा व्हिडीओ आहे, हा व्हिडीओ पाटबंधारने खात्याच्या मालकीच्या धरणावर कसा शूट केला गेला असा सवाल गोवा फाॅरवर्डचे प्रवक्ते प्रसांत नाईक यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची चौकशी करावी असी मागणीही नाईक यांनी केली आहे.
या प्रकरणाची चौकशी व्हावी, जर पाटबंधारे खात्याच्या परवानगीने हा प्रकार झाला असेल तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री फिलिप नेरी रोड्रिग्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी फाॅरवर्ड पक्षाकडून करण्यात आली आहे.
गोवा फाॅरवर्डच्या महिला शाखेच्या अध्यक्षा अश्मा सय्यद यांनी देखील या व्हिडीओला तीव्र आक्षेप घेतला आहे. याआधी गोव्याची ओळख ड्रग्स डेस्टिनेशन म्हणून झाली होती. आता हे सरकार गोव्याची जाहिरात पाॅर्न डेस्टिनेशन म्हणून करू पाहत आहे का, असा सावलही सय्यद यांनी केला आहे. तसेच गोवा फाॅरवर्ड याप्रकरणी रीतसर तक्रार नोंदविणार असल्याचेही सय्यद यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याची माहिती गोव्याचे पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी दिली आहे.