सरकारी बँक खातेधारकांना अर्थ मंत्रालयाचा ‘मोठा’ दिलासा! तीन ‘ट्रान्झॅक्शन’नंतर…

नवी दिल्ली – कोणत्याही सरकारी बॅंकेने सेवा शुल्कात वाढ केली नसल्याचे स्पष्टीकरण अर्थमंत्रालयाने केले आहे.  बडोदा बॅंकेने सेवा शुल्कासंदर्भात काही बदल केले होते व त्याची अंमलबजावणी एक नोव्हेंबरपासून सुरू झाली होती.

मात्र सध्याची करोनाव्हायरसची परिस्थिती पाहता बडोदा बॅंकेने सेवा शुल्कात केलेले बदल परत घेतले आहेत. बडोदा बॅंकेने तीन वेळा रक्कम काढणे आणि भरणे शुल्कमुक्त ठेवले होते. त्यानंतरच्या व्यवहारावर शुल्क लावण्याची घोषणा केली होती. 

मात्र हा निर्णय बॅंकेने परत घेतला आहे. इतर कोणत्याही सहकारी बॅंकेने सेवाशुल्क वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 41 कोटी 13 लाख जनधन खात्यासह एकूण 60 कोटी 4 लाख बचत खात्यावर कसलेही शुल्क आकारले जात नाही, असेही अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.