मुंबई – गोव्यात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा एकमेकांसोबत दिसले होते. तेव्हापासून हे दोन्ही कलाकार त्यांच्यातील रिलेशनमुळे चर्चेत आहेत. नुकतेच दोघेही गोव्याहून मुंबई विमानतळावर येताना दिसले. आता, चाहते तमन्नाच्या गोवा ट्रिपच्या नवीन इंस्टाग्राम पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत आणि विजयबद्दल विचारत आहेत.
नुकतेच तमन्नाने गोव्यातील काही व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये तमन्ना बीचसह कॅफेमध्ये बसलेली दिसते. वेगवेगळ्या स्टाईलचे गोव्यातील फोटो पाहून चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये अनेकांनी अभिनेत्रीला विजयबाबत प्रश्न विचारले आहेत. एका युजरने लिहिले एकटीच का फिरतेय ? तर दुसऱ्याने तुझी न्यू इयर पार्टी अजून संपली नाही का ? तर आणखी एकाने फोटो काढणारा विजय होता का ? असा सवाल कमेंट करून विचारला आहे.
View this post on Instagram
यावर्षी तमन्ना नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘बोले चुडिया’मध्ये दिसणार आहे. विजय शेवटचा आलिया भट्टसोबत ‘डार्लिंग्स’मध्ये दिसला होता. तो पुढे सुजॉय घोषच्या केगो हिगाशिनोच्या जपानी कादंबरीच्या द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्सच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये करीना कपूर आणि जयदीप अहलावत यांच्याही भूमिका आहेत.