मुंबई – बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ हा चित्रपट काही दिवसांतच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग देखील झाले आहे. मात्र हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी शाहरुखने सोशल मीडियावर ‘आस्क एसआरके’ सेशनच्या माध्यमातून चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली आहे. मात्र एका चाहत्याने शाहरुखकडे केलेल्या एका मागणीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
शाहरुख खानच्या एका चाहत्याने ट्वीट केलं आहे की, “मी बेरोजगार बॉयफ्रेंड आहे. मला माझ्या गर्लफ्रेंडसोबत ‘जवान’ सिनेमा पाहायचा आहे. त्यामुळे मला या सिनेमाचं फ्रीमध्ये तिकीट देशील का?”. या प्रश्नाचं उत्तर देत किंग खान म्हणाला, “मी फ्रीमध्ये फक्त प्रेम देतो… तिकीटासाठी तर पैसेच मोजावे लागतील. रोमान्सच्या बाबतीत एवढा चीपपणा का? लवकर जा.. तिकीट काढ आणि तुझ्या जवळच्या व्यक्तीसोबत सिनेमा बघ.”
Free mein pyaar deta hoon bhai….ticket ke toh paise hi lagenge!! Don’t be cheap in romance go and buy the ticket…and take her with u. #Jawan https://t.co/uwGRrZkz9I
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 3, 2023
तर दुसऱ्या एका यूजरने त्याला विचारले की ‘जवान 2’ कधी येणार? यावर शाहरुखने मजेशीर उत्तर देत म्हंटले की, “आधी हे बघ… बच्चे की जान लोगे क्या?” हा प्रश्न पाहिल्यानंतर सर्वजण ‘जवान’ नंतर ‘जवान 2’ची वाट पाहत आहेत. या उत्तरानंतर किंग खानचे चाहते खूश झाले असून त्याचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, ‘जवान’ हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा, दीपिका पादुकोन आणि विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.