नवी दिल्ली : बिहारचे ज्येष्ठ नेते लालुप्रसाद यादव यांची काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी लालुप्रसाद यादव यांनी गांधी यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आदरातिथ्य केले. लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या हाताने बनवलेले मटण राहुल गांधी यांना खाऊ घातले. याचा एक व्हिडिओ राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटरवर शेअर केला आहे.
राहुल गांधी आणि लालूप्रसाद यादव यांच्यात या भेटी दरम्यान भाजपचे राजकारण, जुने किस्से अशा अनेक विषयांवर गप्पा झाल्या. देशातील विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक झाल्यानंतर राहुल गांधी यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. यावेळी त्यांची विविध विषयांवर चर्चा झाली. तर लालू यांनी आपल्या हाताने ‘स्पेशल सिक्रेट रेसिपी’ने राहुल गांधी यांच्यासाठी मटण बनवले होते.
लोकप्रिय नेता, लालू जी से उनकी सीक्रेट रेसिपी और ‘राजनीतिक मसाले’ पर दिलचस्प बातचीत हुई।
ग़रीबों, वंचितों, अल्पसंख्यकों और महिलाओं के लिए INDIA की सोच एक है – समानता, प्रगति और सशक्तिकरण।
लालू जी से मेरी ख़ास मुलाक़ात का पूरा वीडियो यूट्यूब पर देखें: https://t.co/5RbVDqVfY0 pic.twitter.com/59jekdEBgQ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 2, 2023
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी लहानपणी पटना येथे मोठ्या भावांकडे गेल्यावर जेवण बनवायला शिकल्याचा किस्सा सांगितला. तसेच भारतीय अर्थव्यवस्था खराब असली की हिंदुत्वाचा मुद्द्यावर भडकावण्याचे काम भाजप करते पण अर्थव्यवस्था चांगली असली की असे होत नाही असे का? यावरही दोघांनी चर्चा केली. यावेळी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव हे सुद्धा उपस्थित होते.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये, “लोकप्रिय नेते लालूजींसोबत त्यांच्या सिक्रेट रेसिपीवर आणि राजकारणाच्या मसाल्यावर चर्चा झाली. गरीब, वंचित, अल्पसंख्यांक आणि महिलांसाठी INDIA चा विचार एकच आहे – समानता प्रगती आणि सशक्तीकरण” म्हटले आहे.