नेवासा – लई माजलास कारे तुझ्या कॉलेजच्या मुलीला मी बोलत असतांना तिला तु .. का हटकले ? तुझ्याकडे बघतोच अशी धमकी देत चक्क ज्ञानेश्वर कॉलेजच्या एका प्राध्यापकासह सिक्युरीटी गार्डला धक्काबुक्की करत डोक्यात बांबू घालत मारहाण करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कॉलेजच्या एका विद्यार्थ्यासह सहा जणांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या झालेल्या जबर मारहाणीत कॉलेजचा सिक्युरीटी गार्ड जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि.१६) दुपारी पाऊने चार वाजेच्या सुमारास घडली राञी या राड्या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांसह निखिल नावाच्या तरुणासह अन्य तीन ते चार जणांवर राञी उशीराने गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे महाविद्यालयात झालेल्या मुलीच्या प्रकरणावरुन चक्क प्राध्यापकासह सिक्युरीटी गार्डला मारहाण केल्याने या राड्याची जोरदार चर्चा तालुक्यात पसरली आहे
याबाबत पोलीस सुञांनी दिलेली अधिक सविस्तर माहीती अशी की,बुधवारी दुपारी पाऊने चार वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर मुलांची गर्दी जमल्याने या महाविद्यालयाचे प्राध्यापक दशरथ आयनर आणि सिक्युरीटी गार्ड पाराजी तागड महाविद्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ आले असता या महाविद्यालयातील विद्यार्थी अनिल बबन माळी व अंकुश अशोक शिंदे हे विद्यार्थी येथे होते त्याचवेळी नेवासा रोड – नेवासा फाटा रस्त्याच्या पलिकडे २० ते २५ वर्ष वयाची पाच ते सहा मुले उभी होती या मुलांमध्ये या कॉलेजचा एक विद्यार्थी विशाल संजय साठे रा.काळेगांव (मुकिंदपूर) ता.नेवासा हा विद्यार्थीही या मुलांमध्ये सहभागी होता.
‘त्या’ घोळक्यातील मुलांमधील एक गोऱ्या रंगाचा तांबडा शर्ट परिधान केलेला निखिल नावाचा मुलगा महाविद्यालयाच्या मुख्यप्रवेशव्दाराजवळ आला व ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या सिक्युरीटी गार्ड पाराजी तागड (रा.सोनई) ता.नेवासा यांना म्हणाला की,”लई माजलास कारे,तुझ्या कॉलेजच्या मुलीला मी बोलत असतांना तिला तु .. का हटकले ? तुझ्याकडे बघतोच अशी धमकी देत तागड यांची गचांडी धरुन धक्काबुक्की केली यावेळी प्राध्यापक आयनर यांनी या मुलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता प्राध्यापक आयनर यांनाही या मुलांनी धक्काबुक्की करुन तोंडावर फटका मारला यावेळी कॉलेजचे विद्यार्थी अनिल बबन माळी व अंकुश अशोक शिंदे हे
दोन जण जवळ असल्याने या मुलांनाही त्या टार्गट मुलांनी शिवीगाळ करत बाजूला ढकलून दिले व सिक्युरीटी गार्डने मुलीला हटकल्याचा राग मनात धरुन ही धक्काबुक्की सुरु असतांना अचानक पलिकडून एक जण जाड बांबू हातात घेवून येवून तागड यांच्या डोक्यात कानाजवळ मारल्याने ते जागेवर बेशुद्ध होवून खाली पडले जखमी सिक्युरीटी गार्डला कॉलेज मधील विद्यार्थी अनिल माळी (रा.अंमळनेर),निखिल सावंत (रा.नेवासा खुर्द),संदिप भुजबळ (रा.भेडा) यांनी रिक्षात टाकून नेवासा फाटा येथील मंगलमुर्ती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
या मारहाणीच्या राड्याप्रकरणी प्राध्यापक दशरथ आयनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात याच महाविद्यालयातील विद्यार्थी विशाल संजय साठे,तसेच निखील (पुर्ण नांव माहीत नाही) याच्यासह अन्य तीन ते चार जणांवर जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस करत आहेत