सर्वोच्च न्यायालयाकडून गुलाम नबी आझाद यांना काश्‍मीर दौऱ्याची परवानगी

न्यायालयाच्या निर्णयानंतर चार जिल्ह्यांचा दौरा करता येणार

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरशी संबंधित एकूण 8 याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यात कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांच्या याचिकेवरील सुनावणीदेखील करण्यात आली. सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने गुलाम नबी आझाद यांना काश्‍मीर दौऱ्याची परवानगी दिली आहे. परंतु, परवानगी देत असताना त्यांना राज्यातील केवळ चार जिल्ह्यांचा दौरा करू शकणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी गुलाम नबी आझाद यांच्यावतील कॉंग्रेसचे नेते वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. आझाद यांच्या याचिकेवर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सशर्त परवानगी दिली आहे. आझाद हे जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्यानंतर कोणत्याही राजकीय कार्यक्रमात भाग घेऊ शकणार नाही. तेथे गेल्यानंतरचा अहवाल त्यांना सर्वोच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे. तसेच यासंदर्भात न्यायालयाने केंद्राला नोटीस देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर आता गुलाम नबी आझाद बारामुल्ला, अनंतनाग, श्रीनगर आणि जम्मू जिल्ह्यांचा दौरा करू शकणार आहेत.तसेच गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्यानंतर आपण आपण कोणतीही सभा घेणार नाही असे न्यायालयास आश्वासन दिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here