हाँगकाँग – करोना महामारी त्या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आता बाकी राहिला असल्याने भारतासह जगात सर्वत्रच या लसीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. नागरिकांनी आपण होऊन पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे यासाठी जगातील बहुतेक देशांनी प्रोत्साहन योजनांची घोषणा केली आहे. अनेक देशांमध्ये सरकार आणि काही खाजगी कंपन्या लोकांनी लसीकरण करण्यासाठी पुढे यावे म्हणून योजनांची घोषणा करत आहेत.
लोकांनी कोरोना लस घ्यावी म्हणून अशीच अनोखी शक्कल हाँगकाँग या देशाने लढवली आहे. येथील प्रशासनाने कोरोना लस घ्या आणि रोलेक्स घड्याळ, टेस्ला कार, सोनं, महागडा फ्लॅटसह भरपूर गिफ्ट्स मिळवा असं म्हटलं आहे. हाँगकाँगने लसीकरणासाठी ही अनोखी ऑफर दिली आहे. ही एक प्रकारची लॉटरी असून, लॉटरी प्रणालीद्वारे विजेता घोषित केला जाणार आहे.
दरम्यान, चीनमधील बीजिंग येथे लसीकरण करून बाहेर पडणाऱ्या लोकांना आईस्क्रीम फ्री दिले जात आहे इस्त्रायलमध्ये अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये लसीकरण करून आलेल्या लोकांना मोफत खाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.