मुंबई – केवळ उद्योगपतीच नाही तर अनेक सिनेतारकांनाही लग्ज़री वस्तूंची आवड आहे. काहींना कोट्यवधी रुपयांची वाहने खरेदी करायला आवडतात, तर काही लाखो रुपयांच्या हँडबॅगमध्ये दिसतात. अशात, बरेच लोक घड्याळांचे शौकीन आहेत, आणि मनगटावर परिधान केलेल्या या छोट्या गोष्टीसाठी लाखो कोटी रुपये खर्च करण्यास मागे हटत नाहीत. यामध्ये सलमान खानच्या नावाचाही समावेश आहे.
View this post on Instagram
किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेला सलमान खान अलीकडच्या काळात घड्याळ घालताना दिसत आहे. फिल्मफेअरच्या पत्रकार परिषदेतही सलमान ते घड्याळ घातलेला दिसला होता.
View this post on Instagram
हजारो कोटींचा मालक असलेल्या सलमान खानने घातलेले घड्याळ किती महागडे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तसे, सलमान खान हा साधेपणा आवडणारा अभिनेता मानला जातो. त्याची जीवनशैलीही अशी आहे की तो सर्व लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतो. मात्र, यावेळी सलमान खान खूपच महागडे घड्याळ घालताना दिसला आहे.
View this post on Instagram
सलमान खानच्या हातातील रोलेक्स घड्याळाची किंमत $57,200 आहे. म्हणजेच त्याची किंमत सुमारे 47 लाख रुपये आहे. हे घड्याळ उच्च दर्जाच्या साहित्यापासून बनवले आहे. ऑयस्टर पर्पेच्युअल डे-डेट 36 डायल घड्याळ. हे 18 कॅरेट पिवळ्या आणि पांढऱ्या सोन्याचे बनलेले आहे. त्यात हिरेही जडले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये सलमानच्या वाढदिवसालाही हे घड्याळ घातल्याचे सांगितले जात आहे.