बर्लिन – जर्मनीच्या वादग्रस्त संरक्षण मंत्री क्रिस्टाईन लांब्रेच्ट (Christine Lambrecht) यांनी आपल्या मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. जर्मनीच्या संरक्षण दलाचे आधुनिकीकरण आणि युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रे पुरवण्याच्या त्यांच्या निर्णयावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका व्हायला लागली होती.
जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्चोल्झ यांना आपण राजीनामा पाठवून दिला आहे, असे लांब्रेच्ट यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून लष्कर आणि जर्मनीचे सुरक्षितेबाबतचे धोरण याबाबत तथ्यात्मक वादविवादावर प्रसार माध्यमांनी विशेष भर दिला होता. अशावेळी सैनिक आणि संरक्षण विभागातील अनेकांचे मौल्यवान काम नेहमीच अग्रभागी राहिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
लांब्रेच्ट यांच्या जागेवर कोणाची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. ओलाफ स्चोल्झ यांनी डिसेंबर 2021 मध्ये जर्मनीच्या चॅन्सेलर पदाची जबाबदारी स्विकारल्यापासून लांब्रेच्ट या जर्मनीच्या संरक्षण मंत्री होत्या.
मनरेगा निधीबाबत सापत्न वागणूक; प. बंगालचे केंद्राकडे 6,000 कोटी रु. थकीत – ममता बॅनर्जी
लांब्रेच्ट या नेहमी संरक्षण मंत्रालयाबाहेरच्या विषयांमध्ये लक्ष घालत असल्याची टीका होत होती. मात्र स्चोल्झ यांनी नेहमीच त्यांना पाठिशी घातले होते.