bollywood news -बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा आमिरसोबत रोमान्स करतांना दिसणार अशी चर्चा सध्या बॉलिवूड गॉसिपमध्ये रंगली आहे. जेनेलिया डिसूजाला आमिरच्या कमबॅक चित्रपट ‘सितारे जमीन पर’मध्ये कास्ट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आमिरने अलीकडेच त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. तो म्हणाला होता की हा चित्रपट ‘तारे जमीन पर’ सारखा असेल, पण त्याच्या 10 पावले पुढे जाऊन या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भेटीला येईल.
‘पिंकविला’च्या वृत्तानुसार, जेनेलिया देशमुखला सखोल चर्चेनंतर या चित्रपटासाठी फायनल केले गेले. जेनेलिया ‘हँड इन अ ग्लोव्ह’ सारख्या मजबूत स्वतंत्र स्त्रीच्या भूमिकेत बसते, असे आमिर खानचे मत आहे. दिग्दर्शकाशी चर्चा केल्यानंतर आमिरने जेनेलियाचा चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून नाव फायनल केले.
जेनेलिया आमिर खानच्या प्रेमिकेची भूमिका साकारणार आहे, विशेष दिव्यांग लोकांच्या टीमला प्रशिक्षित करण्यासाठी ती नायकाच्या बरोबरीने पाऊल टाकेल. ही भूमिका आणि आमिरसोबत काम करण्यासाठी जेनेलियाही खूप उत्सुक आहे. स्क्रिप्ट आणि पात्रांची मागणी लक्षात घेऊन ही एक आदर्श कास्टिंग आहे.
आमीर ‘सीतारे जमीन पर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. याबाबत त्याने सांगितले,’मी ‘सीतारे जमीन पर’ या चित्रपटात काम करत आहे आणि त्याची निर्मितीही करत आहे. ‘तारे जमीन पर’ ही थीम घेऊन आम्ही दहा पावले पुढे जात आहोत. त्या चित्रपटाने तुम्हाला रडवले, हा चित्रपट तुम्हाला हसवेल. आमिर पुढे म्हणाला,’मी ‘तारे जमीन पर’ मधील दर्शील सफारीच्या व्यक्तिरेखेला मदत केली होती, पण या चित्रपटात नऊ मुले मला त्यांच्या समस्यांमध्ये मदत करतील.’ असेही आमिरने सांगतले आहे.