बंगळुरू – कर्नाटकचे नवे राज्यपाल म्हणून थावरचंद गेहलोत यांनी आज सूत्रे स्वीकारली. राजभवनावर झालेल्या शपथविधीच्या सोहळ्यात कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अभय श्रीनिवास ओका यांनी त्यांना अधिकार पदाची शपथ दिली.
यावेळी मुख्यमंत्री येडियुरप्पांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेहलोत हे मूळचे मध्य प्रदेशातील दलित कुटुंबातील असून, ते सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. या आधी ते केंद्रात सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणून काम पाहत होते. 73 वर्षीय गेहलोत हे राज्यसभेचे सदस्य होते, पण आता त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
जनसंघाच्या काळापासून म्हणजेच 1962 पासून ते सक्रिय राजकारणात आहेत. 1980 साली ते प्रथम आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर सतत तीन वेळा ते आमदार झाले. त्यानंतर 1996 मध्ये ते प्रथम लोकसभेवर निवडून गेले. तेथेही सलग चार वेळा ते लोकसभेवर निवडून गेले.