Gayatri Joshi : ‘स्वदेश’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीचा (Gayatri Joshi ) काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघतामध्ये गायत्रीसह (Gayatri Joshi ) तिचा पती विकास ओबेरॉय (Vivek Oberoi) देखील जखमी झाले होते. या अपघाताचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. हा इतका भीषण अपघात होता की, यात समोरच्या गाडीमधील जोडप्याचा मृत्यू झाला होता.
मात्र रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आता गायत्रीची तब्येत बरी झाली असून तीपहिल्यांदाच सगळ्यांसमोर आली आहे. एका कार्यक्रमात ती हजर राहिली होती. येथील तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’चा लाँचिंग सोहळ्यात गायत्री पतीसह हजर राहिली होती. यावेळी तिने स्टायलिश रफल्ड स्लीव्हजसह एक सुंदर पिवळा गाऊन परिधान केला होता. तर पती निळ्या रंगाच्या शार्प सूटमध्ये दिसला.
नुकतंच मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील ‘जिओ वर्ल्ड प्लाझा’चा लाँचिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित राहिली होते. याचवेळी अभिनेत्री गायत्री जोशी पती विकास ओबेरॉयसह पाहायला मिळाली.
गायत्रीने स्टायलिश रफल्ड स्लीव्हजसह एक सुंदर पिवळा गाऊन परिधान केला होता. तर पती निळ्या रंगाच्या शार्प सूटमध्ये दिसला. सध्या दोघांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतं आहेत.
दरम्यान, भीषण कार अपघातानंतर गायत्रीने स्वतः ‘द फ्री प्रेस जर्नल’ला सांगितलं होतं की, “विकास व मी इटलीमध्ये आहे. आम्ही भीषण अपघाताचा शिकार झालो होतो. ईश्वराच्या कृपेने आम्ही दोघं सुखरुप आहोत.”
गायत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती एक व्हिडीओ जॉकी आणि मॉडेल आहे. २००० साली फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा खिताब जिंकल्यानंतर तिच्या करिअरला सुरुवात झाली होती. त्यानंतर २००४ साली ती ‘स्वदेस’ चित्रपटात झळकली.
शाहरुख खानबरोबर ती महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. मग २००५ साली गायत्रीने व्यावसायिक विकास ओबेरॉयशी लग्न केलं आणि तेव्हापासून ती अभिनय क्षेत्रापासून दूर आहे.