World Cup 2023 New Zealand vs South Africa Match Update : विश्वचषकातील 32व्या सामन्यात न्यूझीलंडसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने सहापैकी पाच सामने जिंकले आहेत. त्याचे 10 गुण आहेत. गुणतालिकेत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने सहापैकी चार सामने जिंकले आहेत. त्यात आठ अंक आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
NZ vs SA Live Score : सध्या 44.2 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 2 बाद 281 इतकी झाली आहे. सध्या रासी वन डर डुसेन हा 121*(109) तर डेविड मिलर हा 12*(13) धावांवर क्रीजवर आहे.
डी-कॉकनंतर डुसेनचं शतक…
रॅसी व्हॅन डर डुसेनने 101 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने शानदार खेळी खेळली असून दक्षिण आफ्रिकेने चांगली धावसंख्या गाठली आहे.
दक्षिण आफ्रिकेला दुसरा धक्का..
क्विंटन डी कॉक 116 चेंडूत 114 धावा करून बाद झाला. टीम साऊदीने त्याला ग्लेन फिलिप्सकरवी झेलबाद केले. क्विंटन डी कॉकने डुसेनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागिदारी रचली. त्यापूर्वी क्विंटन डी कॉकने शानदार फलंदाजी करत आणखी एक शतक झळकावले. डी कॉकने 103 चेंडूत 2023 विश्वचषकातील चौथे शतक झळकावले. त्याच्या या शानदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 200 धावांच्या पुढे गेली.
#CWC23 #SAvNZ : न्यूझीलंडचा गोलंदाजीचा निर्णय; दोन्ही संघात एकेक बदल, जाणून घ्या… Playing 11
न्यूझीलंडला पहिले यश…
दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट 38 धावांवर पडली. कर्णधार टेंबा बावुमा 28 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टने त्याला डॅरिल मिशेलकरवी झेलबाद केले.