मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा आहे. ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’(Gautami Patil) . दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या (Gautami Patil) कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही.
गौतमीचा (Gautami Patil) कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च. कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते.
सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तिचा चाहता वर्ग इतका मोठा आहे की, तिची एक झलक पाहण्यासाठी लोक वाटेल ते कराताना दिसतात.
गौतमीने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो क्षणार्धात व्हायरल होतात. अशातच गौतमीने नुकतेच शेअर केलेल्या फोटोनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. गौतमी पाटीलने चुलीपुढं बसून भाकऱ्या थापतानाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
गौतमीच्या या अंदाजावर चाहते फिदा झालेत. तिच्या या फोटोनी सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातलाय. गौतमीचे फॅन्स तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत. तिच्या साध्या सौंदर्यावर चाहते भाळले असून, सर्वांनाच तिचा हा अंदाज आवडला आहे.