नवी दिल्ली : देशातील करोनाबाधितांसाठी माजी कसोटी क्रिकेटपटू व खासदार गौतम गंभीरने 50 लाख रुपयांचा निधी घोषित केला आहे.
देशातील जनतेवर या करोनामुळे सर्वस्व गमावण्याची वेळ आली आहे. यातून सावरण्यासाठी कितीही केले तरी कमीच पडेल मात्र त्यात मी माझा खारीचा वाटा उचलत आहे, असे गंभिरने सांगितले आहे.
दरम्यान, भारतातील करोना बाधितांची संख्या वाढून 649 वर जाऊन पोहोचली. मुंबईत एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू गुरूवारी दुपारी झाला. त्यामुळे मृतांची संख्या 14 वर जाऊन पोहोचली. गुजरात, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात एक बळी नोंदवण्यात आला. सध्या प्रत्यक्ष करोनाचे बाधित असणारे 593 असून 42 जण या संसर्गापासून बरे झाले आहे. बाधितांमध्ये 47 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.