नवी दिल्ली – पूर्व दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या लोकसभा उमेदवार आतिशी मार्लेना यांच्याविषयी गौतम गंभीर यांनी कथित आक्षेपार्ह पत्रक काढल्याच्या प्रकरणाने आता आता अधिक ‘गंभीर’ वळण घेतलं आहे. यावर आज गौतम गंभीर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
गौतम गंभीर यांनी यावर तीन आव्हानं दिली होती. यापैकी दुसऱ्या आव्हानात त्यांनी म्हटलं होतं की, वादग्रस्त पत्रकासंदर्भात आपल्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाले तर राजकारण देईन. त्यानंतर गौतम गंभीर यांनी आता पुन्हा एकदा आप आणि केजरीवाल यांनी तिसरं आव्हान देताना म्हटलं आहे की, आरोप सिद्ध करून दाखवा, मी जनतेसमोर स्वत:ला फाशी देईन.
गौतम गंभीर यांनी ट्विटर वर आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करत लिहीलंय की अरविंद केजरीवाल आणि आप पार्टील हे तिसरं आव्हान. ही पत्रकं वाटण्यामागे माझा काही हात आहे हे सिद्ध करा, मी जनतेसमोर फाशी घेईन. पण हे सिद्ध करू शकला नाहीत तर अरविंद केजरीवाल यांना राजकारण सोडावं लागेल. तुम्ही तयार आहात का?’
Challenger Number 3 to @ArvindKejriwal and @aap. If he can prove that I have anything to do with this pamphlet filth, then I will hang myself in public. Otherwise @ArvindKejriwal should quit politics. Accepted?
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) May 10, 2019
दरम्यान, भाजपकडून पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्यावर आपच्या नेत्या आणि उमेदवार आतिशी मार्लेना यांनी गंभीर आरोप केले. आतिशी यांनी गंभीरच्या समर्थकांनी पत्रक वाटप केल्याचा आरोप केला आहे.
आतिशी यांनी समर्थकांनी वाटलेल्या या पत्रकांमध्ये, त्यांच्या जातीबाबत, आई वडिलांबाबत, माझ्याबाबत अपशब्द वापरण्यात आले आहेत, असे सांगत असताना आतिशी यांना पत्रकार परिषदेत रडूही कोसळले. दरम्यान त्यांनी जी पत्रकं माझ्याविरोधात वाटली जात आहेत ती वाचणंही लज्जास्पद आहे असंही आतिशी यांनी म्हटलं आहे.