पुणे(प्रतिनिधी) – स्मार्ट पुण्यात काय होईल हे सांगता येत नाही. सकाळच्या वेळी रस्ते सफाई करणारे कामगार आपल्याला ठिकठिकाणी दिसतात.
त्यांच्या वेगवेगळ्या तऱ्हा आपल्याला ठाऊक आहेत; पण सोमवार पेठेतील केईएम रुग्णालयाच्या दुसऱ्या गेटच्या आणि शाहू उद्यानाजवळ एक सफाई कामगार रस्त्यावरील कचरा चक्क गटारीवर असलेल्या सिमेंटच्या झाकणाच्या फटीतूनच गटारीत लोटत आहे, आणि हे आजचेच नाही, तर रोज याच पद्धतीने कचरा गटारीत टाकला जातो आहे.
त्याच्या बाजूला कचरा गोळा करणारा कामगार हातात पोते घेऊन उभा असतो; पण कचरा त्यात टाकला जात नाही. कामगाराच्या या “उद्योगा’मुळे पावसाने गटारे तुंबली तर त्याला जबाबदार कोण… ? हा प्रश्न मात्र इथे उपस्थित होत आहे.