आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेस नगरसेवक सागर तुळशीराम भोसले यांनी संगणक भेट दिला.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंड चालू रहावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये अशी समाजातील सर्वांची अपेक्षा आहे. यासाठी व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून मायक्रोसाॅफ्ट टिम्स, गुगल मीट, झूमद्वारे ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये आॅनलाइन शिक्षण देणे सुरु आहे. यात अधिक सुलभता यावी यासाठी नगरसेवक भोसले यांनी प्रशालेस एक संकणक सुपूर्द केला.
याप्रसंगी अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, सिद्धनाथ चव्हाण, सूर्यकांत मुंगसे, किसन राठोड, प्रशांत सोनवणे, प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, पूजा भोसले यांसह आदी उपस्थित होते.