मुंबई – बॉलिवूडचा रियल बागी म्हणजेच अभिनेता ‘टायगर श्रॉफ’ (tiger shroff) पुन्हा एकदा आपला जबरदस्त अॅक्शन अवतार दाखवण्यास सज्ज झाला आहे. ‘गणपत’ (Ganpath Trailer) या आपल्या आगामी चित्रपटातून टायगर लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
टायगर सिनेसृष्टीत खासकरून अॅक्शन सीनसाठी ओळखला जातो. ‘गणपत’ (Ganpath Trailer) एक अँक्शन थ्रीलर चित्रपट यामध्ये टायगर (tiger shroff) सोबत अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमीकेत दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर आणि टिझर टायगर श्रॉफने आपल्या इंस्ग्रामवर शेअर केले होते. मात्र, अश्यातच आता या सिनेमाचा ऑफिशल ट्रेलर देखील समोर आला आहे.
या ट्रेलरमध्ये टायगर आणि क्रिती जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. प्रेक्षकांना सिनेमात रोमान्स आणि अॅक्शनचा डबल डोस पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच ती चित्रपटात अॅक्शन व स्टंट करताना दिसत आहे.
याबरोबरच ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चन यांची धडाकेबाज एन्ट्री लक्ष वेधून घेणारी आहे. दरम्यान, हा चित्रपट 20 ऑक्टोबरला हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.