बडोदा – महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गुजरातच्या वडोदरामध्ये एका तरुणीनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीनं मित्राला फोन करून आपल्यावर सामूहिक बलात्कार झाला असल्याचं सांगितलं होतं.
बडोद्यामधील लक्ष्मीपुरा भागात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने शुक्रवारी सकाळी आत्महत्या केली. या तरुणीची तीन तरुणांबरोबर मैत्री होती. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीनं तीन मित्रांबरोबर दारु प्यायली होती. मात्र त्यानंतर तरुणीनं तिच्या मित्रांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला.
आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने सकाळी तिच्या मित्राला फोन करून संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यावर तिच्या मित्राने पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. मात्र तरुणीने बदनामीच्या भितीने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी तरुणीने तिघांचा व्हिडीओ देखील केला होता. पीडित तरुणी जॉब करून शिक्षण घेत होती. ज्या कंपनीत ती काम करत होती, त्याच कंपनीतील मित्रांसोबत तिने पार्टी केली होती. आईच्या निधनानंतर ती एकटी रुम करून राहात होता.
पार्टीमध्ये जास्त दारु प्यायल्यानंतर तरुणी नशेत होती. नशेमध्ये बुडालेल्या अवस्थेत तिचा गैरफायदा घेत दिशांत नावाच्या तरुणानं तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपात दोघांना अटक केली आहे.