इस्तंबूल – सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा आणि त्याचा मालक यांच्यातील घट्ट नातं पाहायला मिळत आहे. एक कुत्रा एका रुग्णवाहिकेच्या मागे धावतोय. या रुग्णवाहिकेमधून त्याच्या मालकाला घेऊन जात आहेत, त्यामुळे तो कुत्रा रुग्णवाहिकेमागे सैरावैरा पळत सुटलाय. या निष्ठावान कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
A dog raced with an ambulance carrying its owner who had fallen ill in Istanbul pic.twitter.com/JLZdCP0ukl
— Reuters (@Reuters) June 10, 2021
हा व्हिडीओ इस्तंबूलमधील आहे. कुत्रा आणि मालकामध्ये असलेले प्रेम आणि बॉन्डिंग या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. हा व्हिडिओ लाखो लोकांची मनं जिंकत आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ वृत्तसंस्था रॉयटर्सने (Reuters) आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. रॉयटर्सच्या ट्विटनुसार, रुग्णवाहिका कुत्र्याच्या आजारी मालकास घेऊन जात होती आणि तो रुग्णवाहिकेच्या मागे पळायला लागला. कुत्र्याचं त्याच्या मालकावर असलेल्या प्रेमाबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.