पुणे – मद्यपान करून कार चालवताना झालेल्या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातून तिची मैत्रीण बालंबाल बचावली, मात्र चालक असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास संगमवाडी येथे घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ऋतुजा विनोद भालेराव (23,रा.विमाननगर) असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर, प्रतीक साहेबराव गोळे (26, रा. नऱ्हे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी रितीका गर्ग (24,रा. विमाननगर) हिने तक्रार दाखल केली आहे.
ऋतुजा आणि प्रतीक एकाच कंपनीत कामाला होते. कामावरुन सुटल्यावर रात्री उशिरा प्रतीक, ऋतुजा आणि रितीका हे वॅगनर आर कारमधून पहाटे फिरायला निघाला होता. यावेळी तो मद्याच्या नशेत होता. भरधाव कार झाडाला धडकून झालेल्या अपघातात ऋतिकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा तपास उपनिरीक्षक विशाल पाटील करत आहेत.