वादग्रस्त व्यक्तींच्या यादीत गांधीजींचे नाव

लंडन – वेल्श सरकारने नुकत्याच केलेल्या ऑडिटमध्ये वादग्रस्त व्यक्तींच्या यादीमध्ये महात्मा गांधी यांचे नाव आहे. ब्रिटनमध्ये ठिकठिकाणी उभारलेल्या पुतळ्यांच्या पार्शवभूमीवर हे ऑडिट करण्यात आले आहे.

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइडची हत्या झाल्यानंतर ब्लॅक लाइव्हस मॅटर ही चळवळ सुरु झाली होती. गुलामगिरी आणि वर्णभेद यांचे समर्थन करणाऱ्या नेत्यांचे पुतळेही पाडण्यात आले होते. त्यानंतर ब्रिटनमध्ये जुलै महिन्यात मार्क ड्रेकफोर्ड यांच्या नेतृत्वाखाली पुतळ्यांचे ऑडिट सुरु करण्यात आले. या ऑडिटव्ह अहवाल आता प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात वादग्रस्त पुतळ्याच्या यादीत महात्मा गांधी यांचे नाव आहे.

वेल्शची राजधानी असलेल्या कार्डिफ शहरात २०१७ मध्ये गांधीजींचा पुतळा उभारण्यात आला आहे. पण हा पुतळा हलवण्याचा किंवा पडण्याचा कोणताही विचार नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. या यादीमध्ये ब्रिटनच्या वसाहतवादाचा पुरस्कार करणारे रॉबर्ट क्लाइव्ह आणि एडवर्ड क्लाइव्ह यांचाही समावेश आहे. त्याशिवाय आफ्रिकेतील नेते नेल्सन मंडेला, क्रिस्तोफर कोलंबस आणि कलाकार पॉल  रॉब्सन यांचीही नावे आहेत.

मराठी शिल्पकार रान सुतार आणि अनिल सुतार यांनी कार्डिफमधील गांधीजींचा पुतळा तयार केला आहे हे विशेष. ब्रिटनमध्ये गांधीजींचे अनेक पुतळे असून त्यापैकी २ राजधानी लंडनमध्ये आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.