मुंबई – पदवीधर-शिक्षक मतदार संघासाठी भाजपा केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी पदवीधर विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2020 साठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
भाजपकडून प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, पुणे पदवीधरसाठी संग्राम देशमुख, औरंगाबादसाठी शिरीष बोराळकर, नागपूरसाठी संदीप जोशी, तर अमरावती पदवीधरसाठी नितीन धांडे यांना उमेदवारी दिल्याचे घोषित करण्यात आले आहे.
दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी राज्य सरकारवर चांगलीच सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी
‘नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. मात्र सरकार बदललं आणि काम ठप्प झालं. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी या सरकारला एक वर्ष लागलं. भाजपचं सरकार असतं तर एक महिन्यात झालं असतं, ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच जातच नाही.’