Ganapath movie – चाहते टायगर श्रॉफ (tiger shroff) आणि क्रिती सॅनन (kriti sanon) स्टारर ‘गणपत’ची (Ganapath movie) आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट 20 ऑक्टोबरला चित्रपटगृहात पोहोचला आहे. मेगास्टार अमिताभ बच्चन यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘गणपत’ (Ganapath) या अॅक्शनपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हापासूनच चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत होते.
टायगरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ उडवून देईल, असे बोलले जात होते. रिलीजच्या पहिल्याच दिवशी सर्व अपेक्षा धुळीला मिळाल्या आणि पहिल्या दिवसाची कमाई (Box Office Collection) खूपच निराशाजनक होती. ‘गणपत’च्या (Ganapath) रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे काही आकडे समोर आले आहेत.
‘गणपत’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. हा चित्रपट टायगरच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात कमी ओपनिंग करणारा चित्रपट आहे. अभिनेत्याचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट ‘हिरोपंती 2’ ची पहिल्या दिवशीची कमाई 6.50 कोटी रुपये होती.
तर ‘बागी 3’ ने 17 कोटींची कमाई केली होती. तर अभिनेत्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘वॉर’ने पहिल्या दिवशी 53.35 कोटींची कमाई केली होती. अगदी ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ ची कमाई 12.06 रुपये होती. अभिनेत्याच्या इतर अनेक चित्रपटांचे ओपनिंग डे कलेक्शनही ‘गणपत’पेक्षा जास्त आहे.
अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा वीकेंडकडे लागल्या आहेत. दसऱ्याच्या सुट्ट्यांमध्ये हा चित्रपट किती कलेक्शन करू शकतो हे पाहणे बाकी आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबरला हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे.