मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन लवकरच एक नव्हे तर दोन प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकीकडे सुष्मिताची वेब सिरीज ‘आर्या 3’ लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे, तर दुसरीकडे तिची दुसरी ‘ताली’ही येत आहे. या वेब सिरीजा ऑफिशल ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसत आहे. ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या ‘गौरी सावंत’च्या जीवनावर आधारित ही सिरीज असणार आहे.
या टीझरची सुरुवात दमदार संवादाने होते. गौरीची भूमिका साकारणारी सुष्मिता म्हणते, ‘मी गौरी आहे… ज्यांना कोणी नपुंसक म्हणतात, तर कोणी समाजसेवक. कोणी याला नाटक म्हणतात, कोणी गेम चेंजर म्हणतात. ही या प्रवासाची कहाणी. शिव्याशापापासून टाळ्या वाजवण्यापर्यंत. जे लोक आपले वास्तव दाखवायला घाबरतात. ते कधीच जिंकत नाहीत बाबू. स्वाभिमान, आदर, स्वातंत्र्य या तिन्ही मला हव्या आहेत…’ असं बोलताना अभिनेत्री दिसून येते.
कोण आहे? ‘गणेश नंदन’ उर्फ गौरी सावंत….
गौरी सावंत यांनी त्यांच्या आयुष्यात खूप वेदना आणि दु:खाचा सामना केला, पण आज ती ट्रान्सजेंडरच्या प्रगतीसाठी काम करत आहे. मराठी कुटुंबात जन्मलेल्या गौरी सावंत यांचे खरे नाव गणेश नंदन होते. तो फक्त सात वर्षांचा असताना त्याची आई वारली होती. त्यानंतर गौरी सावंत यांचे संगोपन तिच्या आजीने केले.
गौरी सावंतला जेव्हा ती मोठी झाल्यावर तिच्या लैंगिकतेची जाणीव झाली यानंतर गौरी सावंत घराबाहेर पडल्या. गौरी सावंत यांनी पुन्हा वेजिनोप्लास्टी केली आणि गणेश नंदनमधून गौरी सावंत कायमची बनली. आणि याच गौरी सावंतचा जीवन प्रवास आता ‘ताली’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ताली’चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे.