शिरूर (प्रतिनिधी) शिरूर शहरातील बीजे कॉर्नर येथे वृद्ध महिलेचा पोलीस असल्याची बतावणी करून अडीच लाखाच्या सोन्याचा बागड्या चोरणारा सराईत चोरट्याला शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या पथकाने अटक केली आहे.
तर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापूरे यांनी या वृद्ध महिलेला तिच्या बांगड्या एकूण किंमत अडीच लाख रुपये वृद्ध महिलेला परत दिल्या यामुळे वृद्ध महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला असून शिरूर पोलीस स्टेशनचे वृद्ध महीलेने आभार मानले, तर अशाप्रकारे चोरी गेलेले दागिने पुन्हा वृद्ध महिलेला देण्याची शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांची दुसरी वेळ आहे. यामुळे शिरूर शहरातून पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व पथकाचे अभिनंदन होत आहे.
मुस्लिम यासीन इराणी ( राहणार श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर) यास पोलिसांच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून महिलेचे चोरी गेलेल्या चार सोन्याच्या बांगड्या पोलिसांनी त्याच्याकडून जप्त करून घेतले आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक सात जून रोजी सकाळी साडेदहा वाजता शिरूर येथील महिला लीला दीपक बडवे वय ६१ वर्ष ह्या सकाळी कामानिमित्त चालक बी जे कॉर्नर येथून जात असताना आरोपी याने वृद्ध महिलेस शिंदे बाईच्या अंगावर चोरट्यांनी चाकूने मारून त्यांच्या अंगावरचे सोने काढून नेले आहे अशी बतावणी करून मी पोलिस आहे असे सांगून आरोपीने वृद्ध महिलेच्या हातातील पाच तोळे च्या चार सोन्याच्या बांगड्या एकूण किंमत दोन लाख पन्नास हजार हातातून काढायला लावून हात चलाखी करून त्यांना हिसका देऊन चोरी करून आरोपी मोटारसायकलने पसार झाला होता.
याबाबत फिर्याद दाखल होतात पोलीस अधीक्षक संदीप पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड ऐश्वर्या शर्मा यांनी पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे या गुन्ह्याबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते.प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे व त्यांच्यासोबत पोलीस नाईक संजय जाधव ,पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र मांडगे , संजय साळवे, विजय जंगम जारवाल यांच्या पथकाने हा तपास करून बातमीदाराला मार्फत माहिती काढून सदर गुन्ह्यातील आरोपी मुस्लिम यासीन इरानी याला अटक करून चोरी केलेल्या सोन्याचे बांगड्या त्याच्याकडून जप्त केल्या, व त्यासन्मानपूर्वक फिर्यादी वृद्ध महिला लीला दीपक बडवे यांना देण्यात आल्या. हा गुन्हा उघडीस आणून चोरीला गेलेला ऐवज जप्त करून तो पुन्हा फिर्यादीस दिल्याने
शिरूर पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे व पथकातील ोलीस कर्मचार्यांचे शिरूर शहरातून कौतुक होत आहे.