राजगुरूनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्यात आज कडाचीवाडी (चाकण) मधील पहिल्या करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून तालुक्यातील येलवाडी १, चाकण २, सोळु ९, सांडभोरवाडी १ असे आज १३ नवीन करोना बाधित व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडले असून तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. अशी माहिती पस समिती सभापती अंकुश राक्षे, आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी दिली. दरम्यान चाकण परिसरात सापडलेल्या १७ पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ४९ व्यक्तींचा स्वब तपासणी अहवाल येणे बाकी आहे.
खेड तालुक्यात शुक्रवारी (दि.२६) रोजी एकाच दिवशी तब्बल १७, दि २७ रोजी ३ तर आज दि.२८ रोजी १३ व्यक्ती असे तीन दिवसात ३३ व्यक्ती तालुक्यातील पॉझिटिव्ह सापडल्या आहेत तर एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीजन्य वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस तालुक्यात कारोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात ९१ पैकी ५१ जणांनी करोनावर मात केली आहे ३८ जण उपचार घेत असून आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.
खेड तालुक्यात करोनाचा कहर झाला असून संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे. आतापर्यंत तालुक्यात तिघांचा बळी गेला आहे. कडाचीवाडी येथील रुणाच्या संपर्कात आलेल्या १७ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्याने चाकण परिसरात करोनाची दहशत परसरली आहे.
या १७ जणांच्या संपर्कात आलेल्या ४९ जणांचे स्वब अहवाल उद्या मिळणार आहेत. तर शहरात करूणा बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या ११ जणांचे स्वब अहवाल निगेटिव्ह आल्याने राजगुरूनगर शहरातील भीतीजन्य वातावरण निवळले आहे