मुंबई – सनी देओलची मुख्य भूमिका असणाऱ्या गदर 2 सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 83.18 कोटी रुपयांची कमाई केली आहे, असे निर्मात्यांनी रविवारी सांगितले. अनिल शर्मा दिग्दर्शित, हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.शर्मा यांनीच पहिला गदर सिनेमा दिग्दर्शित केला होता.
त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सनी देओलच्या जादूने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे, पहिल्याच दिवशी रेकॉर्ड तोडल्यानंतर, चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सर्वात वेगवान रु. 100 कोटी क्लबच्या दिशेने हा चित्रपट वाटचाल करीत आहे 83.18 कोटींची कमाई आधीच गाठली आहे. झी स्टुडिओज निर्मित, या चित्रपटात अमीषा पटेल ही सकीनाच्या भूमिकेत आणि उकर्ष शर्मा चरणजीतच्या भूमिकेत आहे.