कराड – माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या गावामधील विकासकामांसाठी स्थानिक विकास निधीतून 4 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, गटर, सामाजिक सभागृह, संभामंडप, ग्रामपंचायतीच्या जागेत स्वच्छतागृह व स्वयंपाकगृह बांधणे, मागासवर्गीय वस्तीत पिण्याच्या पाण्याची टाकी, स्मशानभूमी सुधारणा व संरक्षक भिंत बांधणे अशी विविध विकासकामे केली जाणार आहेत.
सदर मंजूर निधीतून खालील कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये सैदापूर-राधाकृष्णनगर येथे अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे 10 लाख, रेठरे खुर्द येथे अंतर्गत रस्ता खडीकरण व कॉंक्रीटीकरण 7 लाख, मुठ्ठलवाडी (भूरभूशी) येथे अंतर्गत गटर बांधणे 5 लाख, शिंदेवाडीत (कोळेवाडी) अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण 5 लाख, दुशेरे (विकासमळा रोड) उत्तम पाटील यांच्या शेतापासून कोडोली हद्दीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण 10 लाख, गोळेश्वर ते मारुती मंदिरापर्यंत मुख्यरस्ता रुंदीकरण व खडीकरण, बी. बी. एम. व कारपेट करणे 10 लाख, कालेटेक येथे सामाजिक सभागृह बांधणे 15 लाख, ओंड येथे सभामंडप बांधणे 10 लाख, येरवळे – जुने गावठाण येथे मागासवर्गीय वस्तीतील अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण व गटर बांधणे 10 लाख, वारुंजीत रस्ता कॉंक्रीटीकरणाच्या दोन कामांसाठी अनुक्रमे 10 व 5 लाख, पाचपुतेवाडी (तुळसण) येथे अंतर्गत आर.सी.सी. गटर 5 लाख, सवादेत ग्रामपंचायत जागेत स्वछता गृह व स्वयंपाकगृह बांधणे 10 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
तर आटके येथे मागासवर्गीय वस्ती अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी 6 लाख, जखीणवाडीत बनपुरीकर विहिर ओढ्यापर्यंत आर.सी.सी. पाईप बंदिस्त गटर बांधणे 5 लाख, तर विष्णुपुरम अपार्टमेंट ते बचपन स्कूलपर्यंत आर. सी. सी. गटर 10 लाख, सैदापूरात रस्ता कॉंक्रीटीकरण 5 लाख, मालखेड येथे गटर 10 लाख, बेलवडे बुद्रुक वार्ड क्र. 3 व 4 मध्ये अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण 10 लाख व वार्ड क्र. 1 व 2 मध्ये अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण व आर. सी. सी. गटर 7 लाख, गोटे येथे रस्ता कॉंक्रीटीकरण 10 लाख, नांदगावात रस्ता कॉंक्रीटीकरण करणे 10 लाख, चचेगाव रस्ता कॉंक्रीटीकरण 10 लाख, मनव रस्ता कॉंक्रिटीकरण 10 लाख, कार्वेत कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटर 10 लाख, शिंगणवाडी स्मशानभूमी सूधारणा व संरक्षणभिंत 7 लाख,
सैदापूरात कक्रीटीकरण व गटर 10 लाख, गोवारेत रस्ता खडीकरण व डांबरीकरण 10 लाख, येवतीत कॉंक्रीटीकरण 7 लाख, वहागावातील किल्ला परिसरात आर.सी.सी. गटर 7 लाख व कॉंक्रीटीकरण आणि गटर 8 लाख, धोंडेवाडीत आर.सी.सी. गटर 10 लाख, मुंढेत कॉंक्रीटीकरण व बंदिस्त गटर 7 लाख, नांदलापूरात बंदिस्त गटर 7 लाख, कालवडेत गटर 7 लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच ओंड रस्ता कॉंक्रीटीकरण 10 लाख, मुनावळेत कॉंक्रीटीकरण 5 लाख, गोळेश्वरमध्ये रस्ता खडीकरण, बी.बी.एम. व कारपेट 5 लाख,
भैरवनाथनगर (काले) कॉंक्रीटीकरण 7 लाख, विंग-धोंडेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण 15 लाख, झुंजारवाडी गटर 3 लाख व स्मशानभूमी कॉंक्रीटीकरण 5 लाख, टाळगावात कॉंक्रीटीकरण 7 लाख, गोळेश्वर रस्ता कॉंक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक 7 लाख, येळगाव कॉंक्रीटीकरण 5 लाख, जखीणवाडी कॉंक्रीटीकरण 5 लाख, घराळवाडी कॉंकीटीकरण 7 लाख, हणमंतवाडी 7 लाख, वहागाव 5 लाख, रेठरे खुर्द 10 लाख, कालवडे 10 लाख, गोंदी मुरमीकरण व खडीकरण 10 लाख, आणे ओढ्याकडेला संरक्षकभिंत 10 लाख, बेलवडे बुद्रुक मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रीटीकरण 10 लाख, रस्ता कॉंक्रीटीकरण करणे 10 लाख, तर मुंढे एय्थे रस्ता कॉंक्रीटीकरण व गटर 10 लाख अशा एकूण 4 कोटी 70 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून विविध विकासकामे मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.