पंढपूर – करोना मुळे गेल्या दोन वर्षात पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना पददर्शन बंद करण्यात आलं होतं. मात्र, आज (दि .२) गुढीपाढव्याच्या शुभ मुहूर्तावर भाविकांसाठी पददर्शन पुन्हा एकदा सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे आज सकाळ पासूनच
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची भली मोठी रांग लागली असल्याची चित्र दिसून येत आहे. पददर्शन पुन्हा एका सुरु केल्यामुळे आज वारकऱ्यांसाठी दिवाळीच्या सणापेक्षाही मोठा सण आहे. आजच्या दर्शनासाठी काही वारकऱ्यांनी ऑनलाईन बुकिंग देखील केले होते.
दरम्यान, गुढीपाढव्याचे औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे. विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक फुलांची आणि दोन टन फळांसहित ही सजावट केली आहे. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे.