मुंबई – हृदयविकाराचा झटका आल्याने आर्यन खान ड्रग प्रकरणातील मुख्य साक्षादीराचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. प्रभाकर साहिल असे या साक्षादीराचे नाव आहे. चेंबूर येथे साहिल यांचे निधन झाले असून त्यांचे पार्थिव आज सकाळी 11 वाजता त्यांच्या अंधेरी येथील घरी आणण्यात येणार आहे. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे.
साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना? pic.twitter.com/vUWNGgVrqw— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 2, 2022
परंतु यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यावर शंका व्यक्त करत केली आहे. त्यांनी ट्विट करत सवाल विचारला आहे की,’मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू झाला आहे. साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना?’ असा सवाल भातखळकर यांनी ट्विट करत विचारला आहे.
कोण आहे प्रभाकर सेल?
ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. या किरण गोसावीचा खासगी अंगरक्षक प्रभाकर सेल होता. एवढेच नाही तर प्रभाकर सेलने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावरही आरोप केले होते. 25 करोड रुपये लाच मागितल्याचा आरोप प्रभाकर सेल यांनी वानखेडे यांच्यावर केला होता.