पुणे – पुनित बालन ग्रुप आयोजित पुण्यातील मानांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या फ्रेंडशिप करंडक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत तुळशीबाग टस्कर्स, शितळादेवी सुपरनोव्हाज् आणि श्रीराम पथक या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.
मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर तुळशीबाग टस्कर्स संघाने नादब्रह्म ड्रमर्स संघाचा 40 धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात शितळादेवी सुपरनोव्हाज् संघाने रंगारी रॉयल्स् संघाचा 20 धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली. श्रीराम पथक संघाने गरूड स्ट्रायकर्स संघाचा 41 धावांनी पराभव करून विजयी सुरूवात केली.
स्पर्धेचे उद्घाटन पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, आरएमडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारीवाल, सिनेअभिनेते अंकूश चौधरी, पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक यातील मान्यवर सदस्य व सहभागी संघांचे खेळाडू आदि उपस्थित होते.
संक्षिप्त निकाल (गटसाखळी फेरी) –
1) तुळशीबाग टस्कर्स : 8 षटकात 2 बाद 111 धावा. (महेंद्र भामरे 60, प्रदीप बांदल नाबाद 15, शुभम जैन 1-25, श्रेयस भंडारी 1-13) वि. वि. नादब्रह्म ड्रमर्स ः 8 षटकात 8 बाद 71 धावा. (अभिषेक राठोड 38, महेंद्र भामरे 2-14, मिथुन चव्हाण 2-2, नितीन पंडीत 2-5). सामनावीर ः महेंद्र भामरे.
2) शितळादेवी सुपरनोव्हाज : 8 षटकात 4 बाद 107 धावा. (गणेश बानगवे 72, सुजित धुमाळ 1-10) वि. वि. रंगारी रॉयल्स ः 8 षटकात 4 बाद 87 धावा. (प्रफुल्ल मानकर 46, पुनित बालन 10, आकाश निंबाळकर 1-17). सामनावीर ः गणेश बानगवे.
3) श्रीराम पथक : 8 षटकात 5 बाद 93 धावा. (अजिंक्य गायकवाड 33, निखील कटवाटे 14, आलोक जेंढे 2-26) वि. वि. गरूड स्ट्रायकर्स ः 8 षटकात 7 बाद 52 धावा. (अलोक जेंढे 19, सोमनाथ कांबळे 17, केतन काळे 2-7, अजिंक्य गायकवाड 2-13). सामनावीर ः अजिंक्य गायकवाड.