Farah Khan: बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शिक फराह खान सध्या सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे दिसते. नुकतेच तिने एक व्हिडिओ शेअर करत तिच्याकडे कपडे नसल्याचे सांगितले होते. तिची ही गोष्ट कळताच फराहचा मित्र आणि दिग्दर्शक करण जोहर तिच्या मदतीसाठी धावून आला आहे. करणने फराहला दिवाळी गिफ्ट म्हणून खूप सारे कपडे पाठवून दिले आहेत.
व्हिडिओमध्ये फराहने करण जोहरला सांगितले होते की, दिवाळी पार्टीत घालण्यासाठी तिच्याकडे चांगले कपडे नाहीत. त्यानंतर चित्रपट निर्मात्याने प्रसिद्ध डिझायनर एका लखानी यांना कलेक्शनसह फराहच्या घरी पाठवले. याचा व्हिडिओ फराह खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना फराहने करण जोहरला टॅग करत ‘दोस्त हो तो ऐसा’ असे लिहिले.
या व्हिडीओच्या सुरुवातीला काही लोक दिसत आहेत. जे कपडे नीट लावत आहे. तिनं सांगितलं आहे की करणनं तिला दिवाळी गिफ्ट दिलं आहे. फराह समोर कपड्यांनी भरलेला एक रुम आहे. तर बॅकग्राऊंडला फराह आहे आणि ती बोलताना दिसते की ‘मी करण जोहरला म्हणाले की, माझ्याकडे दिवाळीला घालण्यासाठी काहीच नाही आहे आणि बघा त्यानं काय केलं. त्यानं लोकप्रिय स्टायलिस्ट एखा लखानीला माझ्या घरी पाठवलं आहे. हे पाहा, किती सारे कपडे आहेत. यात मी माझ्या संपूर्ण क्रूसोबत मिळून चित्रपट बनवू शकते.’
View this post on Instagram
पुढे या व्हिडीओत एक व्यक्ती बोलताना दिसतो की, ‘वजन कमी केल्यानंतर तू खूप सुंदर दिसते. त्यामुळे मला असं वाटतं की तू वेगवेगळे कपडे ट्राय केले पाहिजे. त्यावर फराह लगेच बोलते की त्यामुळेच मी हे रील बनवते. थॅंक्य, तुला आता आणखी काही बोलण्याची गरज नाही.’ दरम्यान फराहचा हा व्हिडीओ पाहून एक नेटकऱ्याने ‘फराह खान खूप लकी आहे की तुझ्याकडे करण जोहर आणि शाहरुख खानसारखा चांगला मित्र आहे.’ असे म्हंटले आहे.