Ananya Pandey – करण जोहरचा शो ‘कॉफी विथ करण 8’ खूप चर्चेत आहे. सनी देओल, बॉबी देओल, करीना कपूर, आलिया भट्ट, सारा अली खान आणि अनन्या पांडे असे अनेक स्टार्स या शोमध्ये सहभागी होणार आहे.
View this post on Instagram
याची सुरुवात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने केली. आता पुढच्या एपिसोडचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये सारा अली खान अनन्या पांडेच्या नात्याचा खुलासा करताना दिसत आहे. यावर अनन्याची प्रतिक्रिया आश्चर्यकारक होती.
‘कॉफी विथ करण’च्या 8 व्या सीझनच्या नवीन टीझरमध्ये नवीन पाहुणे पाहता येणार आहेत. यात सनी देओल, बॉबी देओल, करीना कपूर, आलिया भट्ट, सारा अली खान, अनन्या पांडे, अजय देवगण, रोहित शेट्टी, काजोल आणि राणी मुखर्जी दिसत आहेत. प्रत्येकजण एक एक करून येतो आणि नवीन खुलासे करतो. दरम्यान, सारा अली खान आणि अनन्या पांडे यांनी डेटिंगचा खुलासा केला.
चॅट शोमध्ये करण जोहरने साराला विचारले की, ‘तिच्या आयुष्यात काय कमी आहे, जे अनन्या पांडेकडे आहे.’ यावर सारा म्हणाली, ‘नाईट मॅनेजर’ यानंतर अनन्या लाजली.
त्याचवेळी, साराच्या उत्तरानंतर अनन्या पांडेनेही एक अप्रतिम प्रतिक्रिया दिली, जी पाहण्यासारखी होती. सुरुवातीला ती लाजली . यानंतर अनन्या रिलेशनशिपच्या वृत्ताला दुजोरा देते आणि म्हणते, ‘मला अनन्या कोय कपूर झाल्या सारखे वाटते.’ यानंतर, व्हिडिओमध्ये इतर कलाकारांनाही त्यांच्या आयुष्याशी संबंधित मनोरंजक गोष्टी बोलताना ऐकू येतात.
अनन्या पांडे आदित्य रॉय कपूरसोबतच्या तिच्या नात्याच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे, मात्र तिने कधीही तिच्या नात्याची अधिकृत पुष्टी केली नाही. मात्र, दोघांनाही अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. नुकताच एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये अनन्या आदित्यच्या भोवती हातात हात घालून दिसत होती. यामध्ये त्यांच्यामध्ये खूप जवळची केमिस्ट्री पाहायला मिळाली.