पॅरिस – फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकची मानांकित खेळाडू पेट्रा क्विटोव्हाने तिसरी फेरी गाठली. तिने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जस्मिन पाओलीनीचा 6-3, 6-3 असा सहज पराभव केला.
स्पर्धेचे संभाव्य विजेतेपद मानले जात असलेल्या अनेक खेळाडूंना या स्पर्धत पराभवाचा सामना करावा लागलेला असताना पेट्रोव्हासारख्या खेळाडू आपला ठसा उमटवत आहेत. अमेरिकेच्या रोज क्लार्लेसने डेन्मार्कच्या क्लारा टुसॅनवर 6-2, 6-3 अशी मात केली व तिसरी फेरी गाठली.
ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिमने अमेरिकेच्या जॅक सॉकवर 6-1, 6-3, 7-6 असा विजय मिळवला. अन्य एका लढतीत माजी ग्रॅण्डस्लॅम विजेत्या सिमोना हालेपने इरिना कॅमेलियावर 6-3, 6-4 अशी मात केली.