लंडन – दिएगो जोताच्या गोलच्या जोरावर लिव्हरपूलने आर्सेनलचा पराभव करत इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली. हा सामना लिव्हरपूलने 3-1 असा जिंकला.
अलेक्झांडर लकात्झे याने 25 व्या मिनिटाला गोल करत आर्सेनलचे खाते उघडले. त्यानंतर सादियो मॅने याने लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली. 34 व्या मिनिटाला अँड्य्रू रॉबर्टसन याने गोल करत लिव्हरपूलला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
अखेरच्या दोन मिनिटात दिएगो जोता याने तिसरा गोल करत लिव्हरपूलचा विजय साकार केला. या स्पर्धेत सातत्याने करोना चाचणी करण्यात येत आहे. त्यातच करण्यात आलेल्या चाचणीत 10 जणांना बाधा झाल्याचे सांगितले जात आहे.