पॅरिस -फ्रेंच ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अपेक्षेप्रमाणे स्टार खेळाडू इगा स्वेटेकने आगेकूच केली आहे. पोलंडच्या या मानाकित खेळाडूने स्पेनच्या ख्रिस्टिना बुस्काचा 6-4, 6-0 असा पराभऴ केला व दुसरी फेरी गाठली. अन्य लढतीत अमेरिकेच्या कोको गॉफने तर पुरुष एकेरीत अलेक्झांडर ज्वेरेन यांनीही आपापले सामने जिंकले.
गॉफ हिने रेबेका मासारोवाला 3-6, 6-1, 6-2 असे पराभूत केले. गॉफने ही लढत एक तास व 46 मिनिटांत जिंकली. अन्य लढतीत कझाकिस्तानची एलिना रायबान्काने चेक प्रजासत्ताकच्या ब्रेंडा फ्रुव्हीट्रोव्हाचा 6-4, 6-2 असा पराभव केला. बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला मात्र, पराभवाचा धक्का बसला.
तिला कॅनडाच्या बिनाका आंद्रेस्क्युकडून 2-6, 6-3, 6-4 असा पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे पुरुष एकेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवने लॉईड हॅरीसला 7-6, 7-6, 6-1 असे पराभूत केले. हा सामना ज्वेरेवने 2 तास व 43 मिनिटांत जिंकला.
अन्य लढतीत बल्गेरियाच्या ग्रीगोर दीमित्रोव्हने कझाकिस्तानच्या टीमफोई दीमीत्रीवीच सातोवचा 6-0, 6-3, 6-2 असा पराभव केला. यजमान फ्रान्सचा गेल मॉंफिल्सनेही आगेकूच करताना अर्जेन्टिनाच्या सॅबेस्टियम बीजवर 3-6, 6-3, 7-5, 1-6, 7-5 असा पराभव केला.