नवी दिल्ली – टोकियो ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भारताचा अव्वल भालाफेकपटू निरज चोप्रा याने येत्या रविवारी होत असलेल्या फॅनी ब्लॅंकर्स कोएन गेम्स, जागतिक थलेटिक्स कॉंटिनेंटल टूअर गोल्ड स्पर्धेमधून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. या महिन्यात झालेल्या डायमंड लीगमध्ये विजेता ठरलेल्या निरजने जागतिक क्रमवारीतही अव्वल स्थान मिळवले होते.
मात्र, सराव करताना त्याच्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाली व यातून पूर्ण तंदुरुस्त होण्यास काही कालावदी आवश्यक असल्याने त्याने या स्पर्देतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. नीरजने नुकत्याच झालेल्या दोहा डायमंड लीगमध्ये 88.67 मीटर अंतर नोंदवताना सुवर्णपदक पटकावले होते.