कोलकाता – पश्चिम बंगाल येथील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. लोकसभा निवडणुकांनंतर आता पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी देखील भाजपशी दोन हात करताना दिसतायेत.
अशातच आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहलं असून याद्वारे त्यांनी बंगाल निवडणुकांना सामोरं जाणार असल्याने केंद्राने तातडीने लसींचा पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. तसेच राज्य सरकार सर्वांचे मोफत लसीकरण करणार असल्याचंही त्यांनी पात्रात नमूद केलं आहे.
या पत्रामध्ये ममता यांनी, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने निवडणूक प्रक्रिया सुखरूप पार पाडण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे जलद गतीने लसीकरण करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं आहे.
तसेच, निवडणुकांवेळी मतदानासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या आरोग्याबाबतही बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, “निवडणुकांवेळी सामान्य मतदारांना मतदानासाठी लस घेतल्याशिवायच जावे लागेल. यामुळे सामान्यांचे लसीकरण देखील तितकेच महत्वाचे आहे असं राज्य सरकारला वाटत.”
पत्राद्वारे बॅनर्जी यांनी, ‘सामान्य नागरिकांच्या व निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी पंतप्रधानांकडे लसींचा पुरेसा साठा उपल्बध करून देण्यात यावा जेणेकरून राज्य सरकारला लसी विकत घेता येतील’ अशी मागणी केली आहे.
West Bengal CM Mamata Banerjee writes to PM Narendra Modi, seeking his help in procurement of COVID-19 vaccines by the state govt to vaccinate everyone free of cost. “West Bengal Govt has decided to procure adequate number of vaccines for members of public at large,” she writes. pic.twitter.com/QOW8v8q4J0
— ANI (@ANI) February 24, 2021