बावडा -संपूर्ण जगावर करोना साथीचे महाभयंकर संकट उभे राहिले आहे. जगाला करोनामुक्त करण्यासाठी बुद्ध जयंतीदिनी बुद्धांना बावडा (ता. इंदापूर) येथील नागरिकांच्या वतीने साकडे घालण्यात आले. इंदिरानगर येथील लुम्बिनी बुद्धविहारात ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. कमलाकांत तोरणे यांच्या हस्ते गौतम बुद्ध यांच्या मुर्तीला पुष्पांजली वाहून पूजा करण्यात आली.
करोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. याप्रसंगी जयंती महोत्सवाचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे, ऍड. वैजनाथ गायकवाड, निशिकांत तोरणे, दादा कांबळे, दत्ता पवळ, संचालक महादेव घाडगे आदी उपस्थित होते.