तळेगाव ढमढेरे -करोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भारत अगेन्स्ट करप्शन शाखेच्यावतीने समाजातील 100 गरजू, गरीब बांधवांना भाजीपाला किट देण्यात आले.
यावेळी जिल्हा संघटक संतोष शिंदे, जिल्हा प्रवक्ते संतोष शेलार, तळेगाव शाखाध्यक्ष अजित शेलार, उपाध्यक्ष समीर बागवान, रामभाऊ जगताप, विशाल कुंभार, अतुल शिर्के, सभासद अमोल घुमे, सोमनाथ शिर्के, सतीश कांबळे, संतोष नरके, राहुल घुमे, बाळासाहेब घुमे, विजय शेलार, सतीश कुंभार, नाना ढमढेरे, प्रफुल्ल आल्हाट, शंकर मुसळे, महेंद्र सादिगले, सचिन गुंदेचा, जितेंद्र गुंदेचा, निलेश गुंदेचा, कदीर शेख, अहमद शेख व भाऊ शिवले हे मान्यवर उपस्थित होते.